!! विठ्ठल !!
तू श्वास तू ध्यास माझा
गौरी तनया तू भास माझा
आनंदाचा महामेरू माझा
दुःखाचा शेवट तू माझा
अंधळ्याच्या गायी राखतो
तो गवळी माझा
राधेचा प्रणय सारथी माझा
ती कुब्जा माझी
प्रण्यात तू गंधाळली माझ्या
बानूचा मल्हारी माझा
मीरेचे प्रीत माझी
मी तुला वाहिलेली !
क्षिताजापलीकडे वाट पाहतो
राम त्या सीतेची
अजून नाही संपली रात्र माझी
जनी म्हणे ये रे तू सावळ्या
विठ्ठल माझा !!!
विठ्ठल माझा !!!
!! अनामिका !!
अलड अवखळ बालपण सरले
तू खेळली सागरगोटे
मनात माझ्या ताजी मुग्धा
बालपणाची सीमा ओंलाडून
तू अवखळ चंचल मुग्धा
मनात माझ्या ठाण मांडून
तुझ्यात तू हरवून
पुस्तक वह्यांना कोरा गंध
मनात माझ्या आजही उरतो
दोन वेण्या पाठीवर
नजर न दिली कोणास
तू तुझ्याचं कोषात बंद
आठवणींचा पाठशिवणीचा खेळ
तुझ्या माझ्या मनात कल्लोळ
अजून जागी होते शाळा
मनात माझ्या
मी हरवतो तळात माझ्या
मला दिसते मुग्धा वेडी
आठवणीला सीमा नसते
मनात माझ्या सीमा असते
का ? कोणास ठाऊक
अनामिका तू
मनात असते
तिच्या आठवणीला सीमा नसते !!!
॥ कातरवेळ ॥
कातरवेळ अशी
संपून जाते
आसक्तीत धुंदी
दूर क्षितिजावर उभी
माझीचं सावली
मला नवी का वाटते
तिन्ही सांजेला
माझीचं मला भेट होते
नव्या स्वप्नांच्या समप्तीवर
तू मला समेवर भेटावे
अशीचं का भक्ती
भावानांच्या लाटेवर
न संपावे तुझे माझे असणे
उरावे मी तुझ्या श्वासात पुन्हा
पुन्हा भेटावे मी तुला
नव्या नव्या रुपात
मी मलाचं भेटावे
पुन्हा पुन्हा