सरदार एक संघर्षची गाथा
डॉ.गणपतराव ढेंबरे , रावेर
प्रास्ताविक : -
साहित्य आणि इतिहास ही अभिव्यक्तीची दोन स्वायत्त माध्यम आहेत. भाषा हे त्या दोहोंचेही माध्यम आहे. तर मानवी जीवन हे त्यांचे आशयद्रव्य आहे. साहित्य आणि इतिहास या स्वतंत्र विद्याशाखा आहेत. साहित्य ही एक ललित कला आहे. तर इतिहास हे एक सामाजिक शास्त्र आहे. या दोनही विद्याशाखांचे प्रयोजन,उपयोजन,इतिहास, स्वरूप आणि महत्त्व हे स्वतंत्र आहे. या दोनही विद्याशाखांचे परसरांशी निर्मितीपासूनच संवादी असे नाते आहे. या दोनही ज्ञानशाखांचे अंतिम उद्दिष्ट हे मानवी जीवनाचा शोध घेणे हेच आहे. किंबहुना मानवी जीवनाचा शोध घेण्यासाठीच या विद्याशाखांचा जन्म झाला आहे. साहित्य आणि इतिहास यांच्या परस्परसंबंधाविषयी राजा दीक्षित म्हणतात, साहित्य आणि इतिहास याचा परस्परांशी काहीच संबंध नाही, अशी भूमिका घेतली जाणे शक्य आहे. विशेषत साहित्यातील कलावादी आणि इतिहास क्षेत्रातील शास्त्रवादी असा संबंध नाकारू शकतात. परंतु साहित्य आणि इतिहास यांचे परस्परसंबंध आहेत. किंबहुना ते निकट असे मानले तर त्याची अनेकपदरी उकल शक्य आहे. यावरून आपल्याला असे लक्षात येते की साहित्य आणि इतिहास याच्यामध्ये अत्यंत जवळचा संबंध आहे. या दोन विद्याशाखांच्या परस्पर संबंधाचा विचार केल्यास या दोन विद्याशाखांच्या स्वरूपावर ,प्रश्नावर प्रकाश टाकला जाऊ शकतो. असे म्हणता येईल. इतिहास हो मानवी जीवनाची कथा आहे.
इतिहासामध्ये चार गोष्टींना महत्त्व असते. व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ या त्या चार गोष्टी होय. साहित्याची निर्मिती हा कलावंतांच्या प्रतिभेचा विकास असतो. साहित्यकृतीमध्यही व्यक्ती, समाज, स्थळ आणि काळ या घटनांना महत्त्व असते. मुळात मानव हाच साहित्य व इतिहास या दोहोंचा केंद्र विषय आहे. इतिहास हा साहित्यकथा वस्तू पुरविणारा एक महत्त्वपूर्ण स्त्रोत आहे. इतिहासाबद्दल प्रत्येक मानसाच्या मनात प्रचंड जिज्ञासा असते. साहित्य निर्मिती करणारा कलावंत आपल्या इतिहासाचा नवा शोध घेण्याचा प्रयत्न करीत असता इतिहासातील व्यक्तीचे भावजीवन आपल्या कल्पना शक्तीने उभा करण्याचा प्रयत्न साहित्यकृतीत होत असतो. इतिहासाच्या अंगाने विचार केल्यास साहित्य हा इतिहासाचा महत्त्वपूर्ण साधन स्रोत आहे. साहित्याचा सामाजिक संदर्भ ही अर्थपूर्ण वस्तुस्थिती असल्याने इतिहासाच्या दृष्टिने ती महत्त्वाची ठरते. मुळातच साहित्यामध्ये तत्कालीन समाज जीवनाचे चित्रण असते. आज 'तळाकडून इतिहास ' हा नवा प्रवाह आता इतिहास लेखनात महत्त्वाचा ठरत आहे. या प्रवाहाचा विचार करीत असतांना साहित्याच्या अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
आजच्या समकालीन समाजाच्या प्रश्नांचा समस्यांचा शोध घेत असताना आपल्या लक्षात येते की, या प्रश्नाचे , समस्यांचे मूळ आपल्या इतिहासात आहे. आपला इतिहास आज नीट समजून घेतल्यास आपल्या पुढील समस्या,प्रश्न सोडविण्याची शक्यता पुढे येऊ शकते. मराठीमध्ये इतिहासाचा शोध घेण्याच्या लेखकांची मोठी परंपरा असल्याचे आपल्या लक्षात येते. या संदर्भात हिंदीतील प्रसिद्ध लेखक राजेंद्र गोहन भटनागर म्हणतात, " नियंत्रणा बाहेर जाणाऱ्या वर्तनमान परिस्थितीवर उपाय असा शाश्वत इतिहास मी शोधत होतो. इतिहासात डोकवताना मला फार मागे जावं लागल नाही. अगदी नजिकच्या भूतकाळात माझा शोध संपला. वर्तमानाला नवीन दृष्टी देण्याची ताकद या इतिहासात आहे. हे मला जाणवलं" लेखकाने वरील विधान 'सरदार' या कादंबरीच्या निर्मितीप्रक्रियेबदल केलेले आहे. भारतीय स्वतंत्र्य लढ्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल हे होय.
'सरदार ' एक ऐतिहासिक कादंबरी :-
हिंदीतील राष्ट्रीय इतिहासावर आधारलेल्या कथा -कादंबऱ्या आणि नाट्यलेखनासाठी प्रसिद्ध असलेले लेखक डॉ. राजेंद्र मोहन भटनागर यांनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या जीवन चरित्रावर 'सरदार' नावाची हिंदी भाषेतून कादंबरी लिहिली आहे. या हिंदी भाषेतील कादंबरीचा केशव अनंत आगाशे यांनी मराठीत फेब्रुवारी २०१० मध्ये अनुवाद केला आहे. राजहंस प्रकाशनाने ही कादंबरी प्रकाशित केली आहे. या कादंबरीचा अनुवाद करण्यामागचा हेतू स्पष्ट करताना केशम अनंत आगाशे म्हणतात, " सरदार वल्लभभाई पटेल म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढयातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व ! या लोहपुरुषाविषयी नवीन पिढीला फारशी माहिती नाही जाणून घेण्याची उत्सुकताही नाही. डॉ. राजेंद्र मोहन भटनागर यांनी वल्लभभाई पटेलांच्या चरित्रावर आधारित 'सरदार' ही अप्रतिम कादंबरी लिहिली आहे. या साहित्यकृतीचा आस्वाद मराठी वाचकांनाही घेता यावा या हेतूनं मी अनुवाद करण्याचा निर्धार केला. या निर्धारातून उत्तम अशी कलाकृती केशन आगाशेनी निर्माण केली आहे. ही कलाकृती एक ऐतिहासिक कादंबरी आहे.
कादंबरी या गद्य कल्पितकथेचा एक उपप्रकार म्हणजे ऐतिहासिक कादंबरी होय. कादंबरी साहित्यप्रकार इतिहासाशी संवाद साधता तेव्हा ऐतिहासिक कादंबरीची निर्मिती होते. ऐतिहासिक कादंबरी दूरवरच्या भूतकाळात घडून गेलेल्या घटनांचे चित्रण करीत असते. भूतकाळाचे वास्तव दर्शन घडविणे ही इतिहासाची प्रतिज्ञा असते. विशिष्ट घटना का आणि कशी घडली, हे जाणून घेण्यात इतिहासाला रस असतो. या घटनांमध्ये सहभागी झालेल्या व्यक्तीच्या अनुभवांचा , जाणिवांचा नवा अन्वयार्थ लावण्याचे कार्य ऐतिहासिक कादंबरी करीत असते. ऐतिहासिक कादंबरीमध्ये इतिहासात घडलेल्या घटनांना आणि समस्यांना महत्त्वाचे स्थान असते. तिच्या पार्श्वभूमी आणि पात्रे इतिहासातील असतात. 'सरदार ' या कादंबरीमध्ये लेखकान सरदार वल्लभभाई पटेलांच्या समग्र जीवनाचा शोध घेतलेला आहे. सुरुवात या कादंबरीची सुरुवात ही मॅट्रिकची परीक्षा नापास झालेले वल्लभ नावाच्या मुलापासून होते. तर कादंबरीचा शेवट भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मृत्यू प्रसंगाने झाला आहे.
'सरदार' कादंबरीचा पट सरदार वल्लभभाई पटेलांच्या जीवनातील ठळक घटना , आहे प्रसंगाच्या आधारे लेखकाने उभा केला आहे. सरदारांचे शालेय जीवन, त्यांचे बॅरिस्टर होण्याचे ध्येय , वेगवेगळी आंदोलने,सत्याग्रह प् इंग्रजांशी सतत संघर्ष, तुरुंगवास, शेतकयाचे प्रश्न , फाळणीच्या काळातील आणि स्वतंत्र्य प्राप्तीच्या नंतरच्या हिंदू मुसलमानाचे प्रश्न , सामान्य जनतेच्या आशा आकांक्षा, अपेक्षा, स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील संस्थानिकांचे प्रश्न अनेक घटना, प्रसंग कादंबरीच्या कथानकात लेखकाने मांडले आहेत.
सरदार कादंबरीमध्ये इतिहासातील अनेक व्यक्ती व घटनांवर प्रकाश टाकला आहे. या कादंबरील महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरू विठ्ठलभाई पटेल,बॅ.जीना,डॉ. राजेंद्रप्रासाद, लॉर्ड माउंटबॅटन,व्ही.पी.मेनन, गोपाल स्वामी अय्यंगार इ. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सक्रिय व्यक्तीच्या परस्परसंबंधावर त्यांच्या स्वाभावाचे विश्लेषण करत कादंबरी आकार घेते. बारडोलीचा सत्याग्रह, इ.स. १९२१ चे असहकार आंदोलन, नागपूर झेंडा सत्याग्रहाचे आंदोलन इ.स.१९३१च्या कराची काँग्रेसचे अधिवेशन, इ.स. १९४२चे चले जाव आंदोलन, भारताचे स्वातंत्र्य, महात्मा गांधीची हत्या स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील संस्थानिकाच प्रश्न आणि सरदार वल्लभभाई पटेलांची ऐतिहासिक कामगिरी या आधुनिक इतिहासातील महत्त्वपूर्ण घटनांचा मांडणी करत सरदार कादंबरी साकार होते.
'सरदार' कादंबरीत वरील ऐतिहासिक व्यक्ती, घटनांचा उल्लेख येतो तसेच ही कलाकृती सरदार वल्लभभाई पटेलांचे भावजीवन वाचकांपुढे मांडते. हे भावजीवन मांडत असताना सरदारांचे कौटुंबिक जीवन ,त्याच्या व्यक्तीगत जीवनातील संघर्ष, मानसिक पातळीवर चाललेले संघर्ष ही कादंबरी चित्रित करते. सरदार वल्लभभाई पटेलांची व्यक्तीरेखा या कलाकृतीची मध्यवर्ती व्यक्तीरेखा आहे. लेखकाने सरदारांची व्यक्तीरेखा उभी करत असताना त्यांच्यातील परिस्थितीचे अचूक आकलन, त्वरीत निर्णय घेण्याची व ते राबवण्याची क्षमता, उत्तम प्रशासक, कठोर शिस्तीमुळे पक्षातील सहकाऱ्यांवर व प्रशासकीय यंत्रणेवर असलेलो विलक्षण जरब, चाणाक्ष बुद्धी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोणाचीही गय न करण्याचे धैर्य, एक सच्चा गांधीवादी या सरदारांच्या जीवनातील मूल्यांचे योग्य विश्लेषण व वर्णन प्रस्तुत कादंबरीत केलेले आहे. या विश्लेषणातून व वर्णनातून सरदार वल्लभभाई पटेलांची व्यक्तीरेख वाचकाच्या मनात उभी राहाते.
सरदार वल्लभभाई पटेलांचे ऐतिहासिक कार्य समाजमनापर्यंत आजही म्हणावे तितके पोहोचलेले नाही. विशेषत सरदार वल्लभभाई पटेलांचे व्यक्तीगत भावजीवन , कौटुंबिक जीवन लोकापर्यंत पोहोचलेले नाही. साहित्य इतिहासातील घटनांचा शोध घेण्या बरोबरच व्यक्तीच्या मानसिक अवस्थेचा अर्थ लावण्यासाठी प्रयत्नशील असते. सरदार कादंबरीमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचे बालपण , त्यांचे कुटुंब पत्नी झवरेबांशी असलेले नाते, कुटुंबातील सदस्यांशी सरदारांचा असलेला स्नेह , मुलगी मणीबेन ,मुलगा डाह्याभाई यांचा पिता म्हणून असणारी सरदार पटेलांची भूमिका , म. गांधींशी वैचारिकदृष्ट्या बांधले गेलेले वल्लभभाई, जवाहरशी असलेले वैचारिक मतभेद ,आणि भारत या राष्ट्राच्या उभारणीसाठी अनंत प्रकाराचे विचारवलये असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांचे विश्लेषण या कलाकृतीला जिवंत करते. किंबहुना वाचकाला पुन्हा एकदा इतिहास व सरदार वल्लभभाई पटेल समजावून देण्याचे कार्य पार पाडण्यात या कलाकृताला यश येते.
सरदार ही एक चरित्रात्मक कादंबरी : -
चरित्रात्मक कादंबरी म्हणजे प्रत्यक्षात होऊन गेलेल्या एका व्यक्तीचे जीवन चित्रित करणारी कादंबरी होय. सरदारा वल्लभभाई पटेल यांच्या संपूर्ण चरित्राची मांडणी लेखक राजेंद्र भटनागर यांनी 'सरदार' कादंबरीत केली आहे.
चरित्रात्मक कादंबरीचे नाते चरित्र व कादंबरी या दोन साहित्यप्रकाराशी लागत असल्यामुळे चरित्र व चरित्रात्मक कादंबरी आणि कादंबरी व चरित्रात्मक कादंबरी या दोन्ही दृष्टींनी या साहित्यप्रकाराचा विचार करायला हवा.'वल्लभाई पटेल चरित्र व काळ' , लेखक त्र्यं.र. देवगिरीकर ,प्रकाशक भारत ग्रंथ माला, पुणे - २,२ ऑक्टोबर १९७१ या चरित्राचा विचार करता राजेंद्र भटनागर लिखित 'सरदार ' कादंबरीमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांच्या जीवनातील बहुतेक घटना, प्रसंगाचे चित्रण आलेले आहे. हे चित्रण लेखकाने इतिहासाशी प्रतारणा न करता केलेले आहे.
सरदार वल्लभभाई पटेलांचे बालपण 'सरदार' कादंबरीत नीटपणे उभे राहत नाही. चरित्रात्मक कादंबरी म्हणून सरदारांचे भावजीवन त्यांच्या जगण्यातील ताण - तणाव, विचारातील द्वंद ,५५० संस्थानाचे विलीनीकरणाचा भाग कलाकृतीत फारसा प्रभावीपणे येत नाही. चरित्रात्मक कादंबरीचा नायक व संबंधित व्यक्ती ही सत्यात पडून गेलेली असते. आणि या व्यक्तीच्या जीवनातील घटिते ही बहुश: सर्वपरिचित असतात. त्यामुळे चरित्रात्मक कादंबरीकाराच्या सृजनशीलतेवर बंधने असतात. ही चरित्रात्मक कादंबरी वाङ्मय प्रकाराची मर्याद मान्य करून 'सरदार' या कलाकृतीचे वेगळेपण आपल्या नजरेत भरते.काळव परिस्थितीचा विचार करताना तत्कालीन इतिहास कथन करावा लागतो जेथे इतिहास नाही. तेथे परिस्थिती काय सांगणार परिस्थिती हो इतिहास घडत असत आणि इतिहासाची निर्मिती व्यक्त करीत असतात. चरित्र परिस्थिती इतिहास व काळ यांचा असा हा अन्यान्य संबंध आहे. चरित्रात्मक कादंबरीत इतिहास
घटना असंग आणि लेखकाच कल्पनाशक्ती यांच्या माध्यमातून चरित्र नायकाचे जीवन मांडलेले असते. प्रदेवगिरीवर सरदार वल्लभभाई पटेल "सरदार
कार ने साधना करणार साधनतेची आसक्ती त्यांना नको त्यांना एकच होते. ते म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याचे व स्वराज्याचे स प्रतिषिय सरदार कदवरीत उमटते, लेखक राजेंद्र भटनागर यांनी सरदारांना वरील रूपातच रेखाटले आहे. सरदार वल्लभभाई पटेल हे राजकारणात सक्रिय होते परंतु ते नव्हते ते संसारी असून संन्यस्त होते. अनेकांचे संसार त्यांनी उभे केले परंतु स्वतःचा संसार त्यांनी उभारला नाही. अखंड भारत देशाला घरमानु महान नेत्याच्या कर्तृत्वाची कथा म्हणजे सरदार हो कादंबरी होय.
'सरदार' या कलाकृतीविषयी या कादबरीचे अनुवाद के अआगाशे म्हणतात "एक होतातडफदार बैरिस्टर बल्लभभाई पटेल नावाचा आवाज युक्तिवाद परतून खटले जिंकू पाहणारा पण योगायोगान त्याची गाठ पडली एका अवलियाशी मोहनदास करमचंद गांधीशी आणि मग चमत्कार घडला वल्लभभाई बदलले त्यांनी वकिली सोडली, अहिंसक सत्याग्रहाचे नेतृत्व स्वीकारले आणि दीनदुबळ्या, असाहाय्य शेतकन्यांचे ते तारणहार 'सरदार' बनले. त्या कांतिकारक परवाची ही अनोखी कथा "५ के अ आगशे वरील प्रमाणे अत्यंत काव्यमय शब्दात या कलाकृतीचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. 'सरदार' या कादबरीची एक उणीव बाटते ती म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांच्या जीवनपटान संस्थानाच्या विलीनीकरणाचे कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. परंतु या कलाकृतचाच अर्थत कमा विश्लेषण आले आहे. सरदार वल्लभभाई पटेलांच्या कार्याविषय, डॉ जयसिंगराव पवार म्हणतात, " संस्थानाच्या विलीनीकरणासुरदारल मनन व लॉर्ड माउंटबॅटन या त्रयीला दिले पाहिजे, सरदार पटेलांची हुशारी, कारारीपणा, राजकारणपटुत्व या गुणांचा राष्ट्राला ऐन मोक्याच्या वेळी मीठा लाभ झाला.. भारत त्यांच्या ऐतिहासिक व अमोल सेवेबद्दल नेहमीच ऋणी आणि कृतज्ञ राहील. " असे प्रभावी विचार डॉ. पवारांनी सरदार वल्लभभाई पटेलांविषयी व्यक्त केले आहेत. परंतु सरदार कादंबरीमध्ये या प्रकरणाचे सखोल विश्लेषण केले असते तर कलाकृतीची अनन्यसाधारण झाली असते असे म्हणता मंचल
'सरदार' कलाकृतीची भाषाशैली विषयाची गंभीर अभिव्यक्त करण्यात यशस्वी झाली आहे. सखाराचा जीवनपट मांडत असताना इतिहास जिवत करण्याचे
सानथ्यं या कलाकृतीच्या भाषेत आह अनुवादक के अ आगाशे यांनी सरदार फलाकृतीचा अनुवाद अत्यंत गंभीरपणे व सहजतने केला आहे. मूळ कलाकृतीतील
विचार भावनाप्रधानता 'सरदार' मध्ये निश्चितपणे आलेली आहे. मूळ लेखकाच्या कलाकृती निर्मितीमागील उद्देशाला थाका न पचवता हो कलाकृती
रसिकापर्यंत पोहचली आहे. यात कोणतीही शंका नाही.
.समकालीन भारतीय राजकारणाची वाटचाल पारात पात भारतीय स्वातंत्र्य लहानलेल्या नेतआदर्श नाही अशा समकालीन समाजासाचा शोध घेत असतो. समाजाच्या सद्यकालीन प्रश्नांचा समस्यांचा उलगडा की नजर
इतिहास शोधला जातो. याचाच एक भाग म्हणजे हिंदी लेखक राजेंद्र भटनागर यांचो 'सरदार' ही कादंबरी होय सरदार वल्लभभाई पटेल यांच्याविषयी अभ्यामक
भा. ल. भोळे म्हणतात, "पटेलांची स्वतंत्र भारतात एकूण उपेक्षाच होत आली आहे. त्यांना 'भारतरत्न' हा किताब मिळायला त्यांच्या मृत्युनंतर ४४ वर्ष जावी लागली है
त्याचच निदर्शक म्हणावे लागेल. शेकडो पुस्ताकाच्या माध्यमातून पटेलाच्या जीवन व कार्याची माहिती वाचकापर्यंत जाण्याची आहे
अभ्यासक भील यांनी व्यक्त केलेला अशावाद सरदार' सारखी कादंबरी वाचनात आल्यावर योग्य असल्याची आपली पटते.
सरदार सारखी सरदार वल्लभभाई पटलांचे जीवन समर्थपणे पेलणारी कलाकृती महाराष्ट्राच्या अभ्यासा
समारोप :
सरदार वल्लभभाई पटेलाचे कार्य, विचार, आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहचण्यास मदत होईल असे वाटते.
संदर्भ टिपा:
दीक्षित राजा, मराठी वाङ्मयकोश खंड चौथा (समन्वयक संपादक विजया राजाध्यक्ष) महाराष्ट्र राज्य साहित्य आि
संस्कृती मंदळ मुंबई प्रथमावृत्ती २००२.४३
भटनागर राजेंद्र मोहन, 'सरदार' (अनु. के अ आगाशे) राणहस प्रकाशन
तंत्रव पृ.११,
पुणे प्रथमावृत्ती २०१०५.०४
दवांगकर वल्लभभाई पटेल चरित्र व काळ, भारत ग्रंथ माला प्रकाशन, पुणे २१९७१.०५
४)
७)
भटनागर राजेंद्र मोहन न मलपृष्ठ
पवार जयसिंगराव, आधुनिक हिंदुस्थानचा इतिहास', विद्या प्रकाशन, नागपूर, प्रथमावृत्ती १९९९.२३३
भा. ल. भोळे, लोहपुरूष (लेखक भास्कर महाजन), तेजस प्रकाशन खिरोदा प्रथमावृत्ती २०१० पृ. ५. ६
२)
३)
प्रा. गणपतराव टेंबरे (मराठी विभाग)
महाविद्यालय, रावेर ता. रावेर, जि. जळगांव
भ्रमणध्वनी क्र. ९४२१०८९२७०
प्रा. डॉ. व्ही. आर. पाटील प्रा. एस. डी. धापसे
श्री. व्ही. एस. नाईक कला, वाणिज्य आणि विज्ञान ई-मेल: dhembregr@gmail.com