"इंदुरीकर कीर्तन प्रबोधन, अध्यात्म की सनातनता "
महाराष्ट्रातील कीर्तन परंपरेला काही शतकांची परंपरा आहे. काळानुसार कीर्तन सादरीकरणात अमुलाग्र बदल झाले. कीर्तन ही समुहाने समूहासमोर सादर करण्याची एक कला आहे. कीर्तनाला प्रारंभ, मध्य आणि शेवट अशा तीन भागांमध्ये विभाजित करता येते. गायन-वादन आणि वक्तृत्व या कलांच्या एकत्रीकरणातून कीर्तनाचे सादरीकरण होते. नारदीय कीर्तन आणि रामदासी कीर्तन असे कीर्तनाचे दोन प्रकार मानले जातात.या दोन्ही कीर्तन परंपराच्या सादरीकरणत काही प्रमाणात भिन्नत्त्व आहे. कीर्तनातील अभंगाच्या चाली ,रागदारी ,वाद्य यामध्ये भेद आहेत. काही कीर्तनकार तबला वाद्य कीर्तनात वापरतात. तर काही मृदुंग या वाद्याचा साथीसाठी उपयोग करतात. काही कीर्तनकार तबला आणि मुर्दुंग यांचा संयुक्तपणे उपयोग करतात. काही कीर्तनकार हार्मोनियमचाही वापर करतात. कुठे तो केला जात नाही. आज मनोरंजनाची साधने बदलली आहेत. वाद्यांची गुणवत्ता कमालीची सुधारली आहे. एक काळ होता जेव्हा अत्यंत साधेपणाने कीर्तन केले जात होते. मोजकी साधने कीर्तनासाठी वापरली जात होती. कमीतकमी वाद्य, टाळ, मृदुंग, वीणा यांचा उचित वापर करून कीर्तन केले जात होते. लोकांना या कीर्तनात गोडवा वाटत होता. लोकांना हे कीर्तन आनंद देत होते. मागील पंचवीस तीस वर्षात कीर्तन परंपरेत आमूलाग्र बदल झाला. वारकरी संप्रदायाच्या इतिहासामध्ये कीर्तन कुणी सादर करावे याबद्दलचे अलिखित नियम आहेत. अध्यात्माचे उचित ज्ञान, प्रचंड वाचन असलेला, पाठांतर असलेला ,गायन कलेचे मुलभूत ज्ञान असणारा व्यक्ती, अभंगाचे पाठांतर असणारा जबाबदार व्यक्ती, भक्ती साधनेची माहिती असणारा व्यक्ती कीर्तनाला उभा राहत असे. या कीर्तनकाराकडे उच्च कोटीची नीतिमत्ता, नैतिकता, साधेपणा, निस्वार्थीपणा असे .फारसे जातीय बंधन कीर्तन परंपरेत पूर्वीपासूनच नव्हती. वारकरी संत अठरापगड जातीतले होते. अध्यात्मिक लोकशाहीच्या मार्गक्रमणात कीर्तन परंपरेचे स्थान महत्त्वाचे असे होते. नामदेव महाराज, तुकाराम महाराज , तसेच विविध संत अठरापगड जातीतून आले होते . अध्यात्मिक क्षेत्रात उंची गाठलेली ही माणसे होती. परंपरेत शूद्र जातींना कीर्तन करण्याचा अधिकार मिळवा ही क्रांतीकार गोष्ट होती. सनातन धर्म परंपरेला यातून शह दिला गेला होता. काळानुसार कीर्तन सांगणारा व ऐकणारा दोघेही बदलत गेले. समाजप्रबोधनाचे अत्यंत महत्त्वाचे साधन म्हणून कीर्तनाकडे पाहता येते. समाजात प्रबोधन करण्यासाठी कीर्तनासारखे माध्यम नाही. अगदी सहजपणे मोठा समुदाय कीर्तनासाठी उपलब्ध होतो. समाजाला दिशा देण्यासाठी या साधनाचा वापर केला गेला. संत तुकारामांनी कीर्तन परंपरेचा अत्यंत सहजपणे वापर केला. धर्मातील चुकीच्या गोष्टी, अनिष्ट परंपरा, प्रथा यांच्याबद्दल प्रचार करण्यासाठी ,प्रबोधनासाठी संत तुकारामांनी कीर्तन या साधनाचा उपयोग केला. आज महाराष्ट्रामध्ये बहुतांश जातीतील कीर्तनकार आहेत. यामध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर जातीतील कीर्तनकार असा भेद करण्यासाठीची कारणे फारशी उपलब्ध नाहीत. महाराष्ट्राच्या सर्व भागांमध्ये वेगवेगळ्या कीर्तनकारांचे वर्चस्व आहे. अनेक महापुरुषांच्या , साधूंच्या नावाने, संप्रदायांच्या छत्राखाली कीर्तनकार आपली सेवा बजावत आहेत. कीर्तन परंपरेत अनेक वाईट प्रवृत्तीचा शिरकाव झाला आहे. काही कीर्तनकारांनी स्वत : स्वतःचे काही भक्तगण, मित्रपरिवार निर्माण करून दबदबा तयार केला आहे. कीर्तन व हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने लाखो रुपयांची उलाढाल होते. आर्थिकदृष्टया सर्वांचा सखोल अभ्यास करता येऊ शकतो. काही कोटींच्या घरातील उलाढाल कीर्तन सप्ताह ,सत्संगच्या निमित्ताने होत आहे. कीर्तनकारांना या आर्थिक उलाढालीमुळे ग्लॅमर प्राप्त झाले आहे. काही छोट्या सावलीच्या लोकांनी पैशासाठी या परंपरेला व्यवसयाचे रूप प्राप्त करून दिले आहे. धर्मामध्ये जसा अपप्रवृत्तींचा शिरकाव होतो, आणि मग सत्य धर्म कोणता? असा प्रश्न निर्माण होतो. तसाच खरी कीर्तन साधना कोणती व बाजारू कीर्तनकार कोणते? याबद्दल संभ्रम निर्माण होतो. कीर्तन ही जिवंत सादरीकरणाची कला आहे . 1990च्या दशकापासून कीर्तनाच्या कॅसेट उपलब्ध झाल्या. या कॅसेटच्या सहज उपलब्धतेमुळे कीर्तनातील लाईव्ह ऐकण्याचा आनंद या तंत्रज्ञानाने हिरावून घेतला. इसवी सन 1990 च्या दशकात अनेक कीर्तनकारांनी स्वतःच्या कीर्तन सादरीकरणाच्या कॅसेट तयार केल्या. या प्रयोगामध्ये एक नाव फार प्रसिद्ध पावले ते म्हणजे बाबा महाराज सातारकर यांचे होय. संगीत ,गायन ,भाषा यांचे उत्तम ज्ञान ,सादरीकरणाची तांत्रिकता अवगत असल्यामुळे बाबा महाराज सातारकर यांना अवघ्या महाराष्ट्रातून लोकप्रियता मिळाली. लाखो रुपयांच्या कॅसेट महाराष्ट्रभर विकल्या गेल्या. जागतिकीकरणाच्या प्रारंभीच्या काळातील ही घटना महत्त्वपूर्ण होती. स्वतःची कला विकण्याचे, मार्केटिंगचे तंत्र बाबा महाराज सातारकर यांनी उत्तम पद्धतीने वापरले. एका कीर्तनाची फी -मानधन , बिदागी काही हजारांपासून लाखांपर्यंत पोहोचली. बाबा महाराज सातारकर 2005 सालापर्यंत अगदी प्रसिद्धीच्या उत्तुंग शिखरावर होते. महाराष्ट्राचा समाज ऑडिओ कॅसेट कडून व्हिडीओ कडे वळला होता. परंतु बदलत्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे तंत्र अजून कीर्तनकारांना गवसले नव्हते. व्हिडीओ कॅसेटचा प्रयोग बाबा महाराज सातारकर यांनी यशस्वीपणे हाताळला नाही. याला तांत्रिक कारणाबरोबरच त्यांचे वयही अधिक जबाबदार होते. बाबा महाराज सातारकर यांनी निर्माण केलेली कीर्तनाची लोकप्रियता शिखराला गेली होती. परंतु त्यांचा पुढील वारसदार अजून ठरला नव्हता. महाराष्ट्रात 2000 सालापासून इंदुरीकर नावाचे वादळ कीर्तन परंपरेत निर्माण झाले. सुमार गायनकला, बेताचे अध्यात्मिक ज्ञान, वारकरी संप्रदायाचे अपूर्ण ज्ञान ,इतिहासाचे चुकीचे आकलन सनातन धर्मप्रियता असूनही इंदुरिकर हा ब्रँड महाराष्ट्राने स्विकारला. इंदुरीकर यांच्या जमेच्या बाजूचा विचार केला तर वास्तवाचे अचूक आकलन ,भाषेतील नगरी गोडवा, हजरजबाबीपणा, उत्तम विनोद सादर करण्याची कला, बोलण्यातील रंजकता,शिक्षण , इंदुरीकर घराण्याची परंपरा,अध्यात्म सामाजिक स्थितीशी जोडण्याचे कसाब,उत्तम मार्केटिंग करण्याचे तंत्र,तंत्रज्ञानाचा अचूक वापर, व्हिडिओ तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर ,युट्युब ,फेसबुक यांचा प्रभावी वापर करण्याचे कसब , अध्यात्माला समाजसेवेचा मुलामा देण्याची शैली या सर्व इंदुरीकर यांच्या जमेच्या बाजू आहेत. यातूनच महाराष्ट्राने इंदुरीकर हा पर्याय स्वीकारला, डोक्यावर घेतला. इंदुरीकरांकडे संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा प्रबोधनाचा स्वच्छ स्पष्ट दिशा देणारा प्रशस्त मार्ग होता.परंतु इंदुरीकर या मार्गाने गेले नाहीत. त्यांनी गाडगेबाबा, तुकडोजी महाराजांचा मार्ग जाणीवपूर्वक नाकारला. इंदुरीकर यांनी आपली प्रतिभा सनातन विचारांना ठसवण्यात वाया घालवली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या घटनेच्या मूल्यांना समाजामनावर ठसवण्याची संधी इंदुरीकर यांनी घालवली. सनातन धर्मातील, मनुस्मृतीतील कालबाह्य गोष्टी जाणीवपूर्वक समाजावर थोपवणे इंदुरीकर यांना महत्त्वाचे वाटले. विनोदातून कर्मठ रूढी-परंपरा, सनातन धर्माचा पुरस्कार त्यांनी कधी जाणीवपूर्वक तर कधी नकळतपणे केला. इंदुरीकर यांच्या कीर्तनातील घातक गोष्टींचा विचार केला तर त्यांच्या कीर्तनातून बुरसटलेले जुनाट विचार , स्त्रियांचा अनादर करणारी विधाने येतात.जातीव्यवस्थेचे नकळतपणे समर्थन येते . कधीकधी व्यसनाधीनतेचे अनावश्यक आंबट वर्णन येते . भाषेतील अश्लीलता ,नको तितक्या थेटपणे कीर्तनातून अनुभवाला येतो. मुळात आपल्याला काय स्वीकारायचे आहे? आणि काय नाकारायचे आहे? यात स्पष्टता नसल्यामुळे इंदुरीकरांचे वैचारिक गोंधळलेपण स्पष्टपणे अधोरेखित होते. वारकरी संप्रदायाची उत्तम जीवन मूल्य ,अध्यात्मिक लोकशाहीतील तत्वे इंदुरीकरांनी जास्त अवगत केली असती तर महाराष्ट्राचे अधिक बरे झाले असते. इंदुरीकरांच्या स्पष्टवक्तेपणाला लोकशाही मूल्यांची जोड मिळाली असती तर फार उचित झाले असते. मागील वीस पंचवीस वर्षात इंदुरीकर यांची लोकप्रियता वाढत गेली. याला आधुनिक तंत्रज्ञानही जबाबदार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही इंदुरीकरनी स्वातंत्र्य, समता, बंधुता,न्याय या मूल्यांचा मनापासून स्वीकार करावा. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या परंपरेला इंदुरीकरांनी पुढे न्यावे .ही काळाची गरज आहे. यातच समाजाचे भले आहे. असे मनापासून वाटते.
वरील लेखाचा उद्देश इंदुरीकरांची समीक्षा करणे हा नसून प्राप्त परिस्थितीचे आकलन मांडणे हा आहे.संत तुकारामांनी कीर्तन परंपरेतील प्रबोधन मार्ग जाणीवपूर्वक मोठा केला. समाजाला नीतीमार्ग सांगण्याचे एक साधन म्हणून कीर्तन परंपरा महत्त्वाची आहे. संत तुकाराम महाराजांची परंपरा पुढे घेऊन जाणे काळाची गरज होती. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या विचारांना, परंपरेला पुढे नेण्याचा अथक प्रयत्न केला. आज इंदुरीकरांचे जेवढी लोकप्रियता आहे, त्यापेक्षा अधिक लोकप्रियता संत गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची होती. संत गाडगेबाबांनी महाराष्ट्र ,मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा राज्यात कीर्तने केली . मराठी, हिंदी भाषेचा वापर संत गाडगेबाबा आपल्या कीर्तनातून करत असत. संत गाडगेबाबांच्या कीर्तन परंपरेचा मधुकर केचे यांनी आपल्या लेखातून उत्तम परिचय करून दिला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आजही गावाच्या उद्धारासाठी नवी व्यवस्था सांगते. संत गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव ,स्मृती ,विचार समाजाला आजही प्रेरणा देतात. समाजमनावर गाडगेबाबांचे, तुकडोजी महाराजांचे नाव अढळपणे कोरले गेले आहे. यामागील कारण मीमांसा तपासले असता एक गोष्ट लक्षात येते. ती म्हणजे संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारातील शाश्वत विचार समाजाला गती व दिशा देतात. शाश्वत विचार स्थळ काळ ,समाज यांच्या मर्यादा ओलांडून जातात. सवंग लोकप्रियता इंदुरीकर यांना मिळाली आहे.केवळ तात्कालिक गोष्टी ,घटना-प्रसंग ,विनोदातून इंदुरीकर सांगतात.हे विचार शाश्वत असत नाहीत. इंदुरीकर यांच्या कीर्तनाला मनोरंजनाचे व्हॅल्यू अधिक आहे. इंदुरीकर कुठलेही ठाम विचार कीर्तनातून सांगत नाहीत. तसा ते फक्त भास निर्माण करतात. शाश्र्वत विचार, मूल्य इंदुरीकर कीर्तनातून सांगत नाहीत. कारण विचारांची दृष्टी, पुरोगामित्व नाकारणारे इंदुरीकर हे एका सोंगाड्या पेक्षा कमी नाहीत. कीर्तन परंपरेतील अभिजातता ,गांभीर्य, उच्च आध्यात्मिक मूल्य इंदुरीकर यांनी घालून टाकले. केवळ कीर्तन परंपरेचा आधार घेत टिंगल-टवाळी, विनोद निर्मिती यातून वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेतील पावित्र्य नष्ट झाले. काळाच्या ओघात इंदुरीकर म्हणजे कीर्तन हा भ्रम समाजात निर्माण झाला. भविष्यकाळातील वारकरी संप्रदायाच्या कीर्तन परंपरेचेनुकसान झाले.युवा कीर्तनकार इंदुरीकर शैली आत्मसात करत आहेत. ही शैली कीर्तन परंपरेचे महत्त्व कमी करून तिला एकपात्री प्रयोगाच्या सादरीकरणाकडे घेऊन जाईल का? अशी शंका वाटते. इंदुरीकर स्वतःला समाजप्रबोधनकार म्हणून घेतात. त्यांच्या विचारांमध्ये, विनोदांमध्ये, शैलीमध्ये ताकद असेल तर त्यांनी कीर्तन परंपरेचा त्याग करावा. स्वतःची व्याख्याने गावोगाव लावावीत. तेव्हा किती प्रेक्षक त्यांच्या व्याख्यानाला येतील, त्यांची लोकप्रियता वाढते की कमी होते हे तपासून घेता येईल. देव, धर्म ,वारकरी संप्रदायाची हजारो वर्षांपासूनची परंपरा यांचा आधार घेऊन स्वतःचा विस्तार करणारे इंदुरीकर वृत्ती ही बांडगुळापेक्षा कमी नाही.
हिणकस विनोद, हेडस नृत्य, अश्लील हावभाव सादर करण्याची कीर्तन ही जागा नव्हे. कीर्तन परंपरेतील पावित्र्य इंदुरीकर यांनी घालवले. याबद्दल वारकरी संप्रदायातील अभ्यासकांनी, संप्रदायाच्या नेतृत्वाने इंदुरीकरांना थांबवणे गरजेचे होते. पण तशी हिंमत कुणीच दाखवली नाही. प्रचंड मोठी कीर्तन परंपरा रसातळाला जाते आहे. पण कुणीच किंमत करत नाही. हा अभ्यासकांचा ,वारकरी संप्रदायातील नीतिमूल्यांची चाड असणाऱ्या नेतृत्वाचा पराभव आहे. परंतु बोटचेपेपणाची भूमिका हा समाजाचा स्थायीभाव झाला आहे. आणि यातूनच इंदुरकरांसारखी माणसे व्यवस्थात जन्माला येत आहेत . इंदुरीकर यांनी राजकारणी लोकांशी संबंध प्रस्थापित केले. राजकारणी मंडळींना इंदुरीकर यांची लोकप्रियता खुणावत होती. राजकारणी स्वार्थातून त्यांच्याजवळ गेले. पब्लिकला मूर्ख बनवणारा एका बाबाला राजकारणी सांभाळू लागले. मागील वीस पंचवीस वर्षातील इंदुरीकर यांच्या कीर्तनाच्या आयोजकांचा शोध घेतला तर आपल्या काय लक्षात येते. गावातील, पंचक्रोशीतील धनदांडगे आपल्या मायाविश्वातून निर्माण केलेल्या काळ्या पैशातून इंदुरीकरांचे कीर्तने ठेवू लागली. दहावे , वर्षश्राद्ध त्यांचे पावित्र्य पुन्हा समाजमनावर ठसवले गेले. इंदुरीकरांचे कीर्तन ठेवून सहज प्रसिद्धी मिळवणाऱ्या राजकारणी, दोन नंबर पैसेवाले, मस्तवाल आणखीन गब्बर झाले. धर्म ,देव यांचा आधार घेऊन स्वतःला पवित्र करून घेऊ लागले अशी बाजारबुनगे तुम्हाला कोसा-कोसांवर नक्कीच भेटतील. कधी कधी इच्छा नसतानाही, बळजबरीने सप्ताच्या , सत्संगाच्या पावती फाडण्यासाठी गोरगरिबांना मजबूर करणारे चेहरे डोळ्यासमोर उभे राहतात. मन अस्वस्थ होते. या पैशातून इंदुरीकर यांना बोलवण्याची स्पर्धा गावागावांमध्ये लागते. यातून अध्यात्माची पवित्रता नष्ट होते. अध्यात्माचा बाजार भरू लागतो. या बाजारातील भणंग शिरोमणी म्हणजे इंदुरीकर होय.
संत तुकारामांच्या परंपरेला पुढे नेणारे अनेक संत महंत महाराष्ट्रात आहेत. परंतु ते शाश्वत विचार, मूल्य सांगतात. त्यांना समाज किंमत देत नाही. समाजाला विकृतीच्या भिकेचे डोहाळे लागले आहेत. संत तुकाराम यांच्या विचारांना पुढे नेणारे संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महत्त्वाचे आहेत.ही पुरोगामी विचारांची परंपरा महाराष्ट्राला नवे भान देणारे आहे. संत तुकाराम ,संत गाडगेबाबा ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुरोगामी विचारांना पुढे नेणारे सत्यपाल महाराज समाजप्रिय आहेत. सत्यपालांचे अस्सल खंजिरी वादन मनाला मोहिनी घालणारे आहे. कीर्तन परंपरेतून छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार स्पष्टतेने मांडणारे सत्यपाल महाराज समाजाला शाश्वत मूल्यांचा मार्ग सांगतात. ठाम नीतीतत्वे समाजाला देतात. विचारांची स्पष्टता असल्यामुळे सत्यपाल महाराज रोखठोक ठरतात. इंदुरीकरांनी सत्यपाल महाराजांचे विचार स्वीकारून प्रबोधनाचा मार्ग निवडल्यास तो महाराष्ट्रासाठी सुदिन ठरेल.
डॉ. गणपतराव ढेंबरे,
मराठी विभाग
श्री .व्ही.एस. नाईक महाविद्यालय रावेर , ता . रावेर, जि . जळगाव
पिन-425508
मोब .नं. -9421081270
dhembregr@gmail.com

छान लेख
उत्तर द्याहटवामागणी नुसार विकले की प्रचंड नफा होतो, सगळे च पैसे कमावण्यासाठी वेगवेगले मार्ग निवडतात ,त्यांचे विकले गेले त्यांनी विकले आपण आपल्या परीने विश्लेषण करत राहायचे तेही विना अनुदानित वर शिक्षक होते
उत्तर द्याहटवा