बबन जागतिकीकरणाच्या परिणामांची चर्चा करणारी कलाकृती !!
नुकताच बबन हा भाऊसाहेब क-हाडे दिग्दर्शित चित्रपट मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर शहरात अंकिता चित्रपटगृहात पाहिला सहाजिक हिंदी भाषिक शहर असल्यामुळे मराठी चित्रपट पाहण्यासाठी गर्दी कमी होती. मोजक्या दहा-पंधरा प्रेक्षकांसोबत हा चित्रपट पाहिला social media इलेक्ट्रॉनिक मिडीया मधून बबन चित्रपटाची जाहिरात बऱ्यापैकी झाली होती . मनात उत्सुकता ठेऊन हा चित्रपट पाहिला .शहर आणि गावाच्या अंधुक सीमारेषेच्या वास्तवातून हा चित्रपट साकारत जातो .मोठ्या शहराला लागून असलेल्या गावांमधून गेल्या वीस-पंचवीस वर्षांत जे काही बरेवाईट परिणाम, बदल झाले आहेत याची सूक्ष्मतेने मांडणी करणारा हा चित्रपट आहे .एकीकडे ही एक व्यक्तिगत असफल प्रेमाची शोकांतिका आहे .शहराला लागून असलेल्या गावांमध्ये उन्मादी, भोगवादी ,निरर्थक उत्सवी मानसिकता जन्म घेत आहे. याची झलक या चित्रपटातून पाहायला मिळाली .या छोट्या गावांमध्ये शहर शिरू पाहते आहे .याची मांडणी या कलाकृतीतून येते. शहरातून हळूहळू खेड्याकडे विस्तारत जाणाऱ्या औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेचे सूक्ष्म चित्रण या चित्रपटातून येते. हा विषय तसा पाहिलं काहीसा उपेक्षितच म्हणावा लागेल. मराठी साहित्य ,नाटक ,चित्रपटातून या विषयावर मूलभूत असे लेखन काही अपवाद वगळता झालेले दिसत नाही .भाऊराव कऱ्हाडे यांनी चित्रपटातून हा विषय मांडला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन ! कारण हा विषय मांडत असताना फार काळजी घ्यावी लागते या विषयातील नाट्य ,गतिशीलता इतकी जास्त आहे की त्यातून केवळ भपकेबाजपणा ,नटवी ,बेगडी चित्रण येण्याची शक्यता असते. भाऊरावने ते नाकारले आहे. आणि चांगली कलाकृती जन्माला घातली आहे. बबन ही एक प्रेम कथा आहे या प्रेमकथेला पार्श्वभूमी सारखी असलेली समकालीन वास्तवाची जोड अधिक रेखीव आहे. जागतिकीकरणानंतर ग्रामीण अर्थव्यवस्था डबघाईला आली. यातून शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाची गुजराण होऊ शकत नाही .त्यामुळे दुग्धव्यवसाय सारख्या शेतीला जोडधंदा म्हणुन नव्या उत्पन्न साधनांची गरज ग्रामीण भागात निर्माण झाली. काही काळाने मूळ शेती व्यवसाय बाजूला पडून दुग्ध व्यवसाय हाच प्रमुख व्यवसाय बनला .दुग्ध व्यवसायातील शोषण ,शासनाचे धोरण ,सहकारी संस्था, खाजगी संस्था यांची कार्यपद्धती यांच्यातील डाव प्रतिडाव पेच , संघर्ष या चित्रपटातून मांडला जातो. शहरालगतच्या गावांमधून एमआयडीसीचे नवे छोटे-मोठे कारखाने उभे राहिले .या नव्या अर्थव्यवस्थेत गावामधील अकुशल अर्धशिक्षित तरुणाईला काही संधी दिसू लागल्या .ज्यांना या नव्या व्यवस्थेत स्थान मिळवता आले नाही .त्यांनी गुन्हेगारीला जवळ केले .या गावांमधून टोळीयुद्ध सुरू झाले. दादा , भाई लोक ,पंटर, टोळीवाले यांनी या भागात दहशत बसवली. ही दहशत एमआयडीसीतील मालक, कामगार ,मजूर ,ठेकेदार यांनाही होती. व त्याचवेळी ती गावातील गरीब शोषित दलित भटके यांनाही या दहशतीची जरब बसली .याचे अस्पष्ट चित्र बबन मधून येते . एमआयडीसीत जमीन गेल्यामुळे काही मोजक्या लोकांकडे अवेळी भरपूर पैसा आला .या पैशातून आणखी पैसा मिळवण्याचे हव्यास सुरू झाला. श्रीमंत वर्गाने पैशाने राजकारण उभे करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात गावातील तरुण पिढी गोवली गेली .ती आपोआप व्यसनाधीनतेकडे वळाली .झटपट श्रीमंत बनण्याचे दिवास्वप्न या पिढीला खुणवू लागले बबन हा त्यांचा प्रतिनिधी आहे .ग्रामीण भागातील तरुणांची मानसिकता या चित्रपटातून मांडली जाते. हताश ,निराशावादी, पराभूत मानसिकता बबन मधून चित्रित होतेे. स्वार्थ साधण्यासाठी मूल्यांशी तडजोड करणारी बबनची मानसिकता आता ग्रामीण भागात जोर धरू लागली आहे .आपले स्थान व्यवस्थेत टिकवण्यासाठी संघर्ष करणारी ग्रामीण भागातील तरुणांची मानसिकता बबन मधून उभी राहते. आजच्या ग्रामीण तरुणांची मानसिकता रोखठोक आहे. काहीही करून आपण उभे राहिले पाहिजे . ही जाणीव बबन मधून व्यक्त होते. ग्रामीण तरुणाईचे गोंधळलेपण ,विस्कटून जाणं या कलाकृतीतून मांडले जाते .या चित्रपटातील स्त्री -पुरुष संबंधाकडे पाहण्याचा नवा वास्तववादी दृष्टिकोन व्यक्त होतो. बबन एकाच वेळी दोन-तीन मुलींसोबत शरीरसंबंध ठेऊ पाहतो .तरीही त्याचं प्रेम कायम आहे .व्यावसायिक धीटपणे शरीरसंबंधकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन वास्तवाला धरून असाच आहे .जागतिकीकरणाच्या नव्या साधनांमुळे स्त्री_ पुरुष संबंध बाधीत झाले आहेत .याचा वेध घेण्यात या कलाकृतीला यश येते. मूल्यांपेक्षा जगण्याच्या लढाईला महत्व देणारा दृष्टिकोन बबन मध्येआहे. वेळप्रसंगी विद्रोहाची वाट धरणारा बबन भाऊसाहेब कऱ्हाडे यांनी छान उभा केला आहे .संघटित गुन्हेगारी पुढे टिकाव न लागलेल्या ग्रामीण तरुणाची शोकांतिका म्हणजे हा चित्रपट होय. या चित्रपटातील गीते संवाद उत्तम आहेत .शिरूर परिसरातील मराठी बोली वेधक अशी आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवते . चित्रपटातील पटकथेमध्ये नायिकेच्या कुटुंबाची कथा, व्यक्तिरेखा नीटपणे उभी राहत नाही. त्यामुळे कथानकातून काहीतरी सुटले आहे .असा भास निर्माण होतो .असे असले तरी बबन चित्रपटाची पटकथा उत्तम आहे चित्रपटाच्या शेवटपर्यंत कळत नाही की पुढे काय होईल. एकूणच प्रेक्षकांच्या आकालनाला आव्हान देणारी ही पटकथा आहे. हा चित्रपट म्हणजे विद्रोहाची कलात्मक आविष्कृती करणारा असा आहे . विशेषतः चित्रपटाचा शेवट अत्यंत निर्णायक, विस्फोटक व विचार करायला लावणारा आहे .शेवटी चित्रपट पाहिल्यावर असं वाटलं की कुठेतरी ही कलाकृती सैराट च्या प्रभावात असणारी कलाकृती आहे. विशेषतः काही चित्रीकरण, संवादाची मांडणी , सूचकताआणि चित्रपटाचा शेवट यावर कुठेतरी सैराट चा प्रभाव आहे काय असे उगाच वाटत राहाते . असे माझे व्यक्तिगत मत आहे .सैराट मराठी चित्रपट सृष्टीतील यशस्वी मैलाचा दगड आहे .त्याचा प्रभाव दहा वीस वर्षे कायम राहील शेवटी कसं बबन म्हणीन तसं .भाऊसाहेब ला पुढील वाटचालीत हम जहॉं खडे सगळ्यापेक्षा बडे हा सूर मिळो ! भाऊसाहेब कऱ्हडे या तरुण दिग्दर्शकाला मनःपूर्वक शुभेच्छा !!
शुभेच्छुक
डॉ . जी .आर. ढेंबरे मराठी विभाग
श्री .व्ही.एस. नाईक महाविद्यालय रावेर ता.रावेर जि. जळगाव
पिन-425508 मोबा . _ 94 21 0 8 12 70

It's fabulous sir
उत्तर द्याहटवाNice & imaginative sir
उत्तर द्याहटवाNice imaginative sir
उत्तर द्याहटवाअप्रतिम
उत्तर द्याहटवाGood explain to rular economy riality tha Yang people and nice imaginative sir
उत्तर द्याहटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा